Election/ रावेर बाजार समितीमध्ये तिरंगी लढत
Election/ रावेर
येथील बाजार समितीच्य निवडणुकीसाठी माघार घेण्यासाठी बाजार समितीच्या आवारात मोठी गर्दी उसळली होती. राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नीलकंठ चौधरी, माजी नगर सेविका छायाबाई महाजन, माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचा माघार घेणाऱ्या प्रमुख उमेदवरात सामावेश आहे.
सोसायटी मतदार संघातून २८ जणांनी माघार घेतली असून २३जण रिंगणात आहेत. महिला मतदार संघातून १२ उमेदवारांनी माघार घेतली आहे. २ जागेसाठी ४ महीला उमेदवार रिंगणात आहेत. ओबिसी मतदार संघातून ८ जणांनी माघार घेतली असून २ जण समोरासमोर लढत देतील.भटक्या विमुक्त जाती जमातीतील ४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. या मतदार संघातून ५ जण रिंगणात आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून १२ जणांनी माघार घेतली. सहा जण रिंगणात आहेत. अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून ५ उमेदवारांनी माघार घेतली असून ३ जण निवडणुक लढणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील ६ जणांची माघार आहे. दोन जण रिंगणात आहे.व्यापारी मतदार संघातून ९ जणांनी माघार घेतली असून ४जण रिंगणात आहेत. हमाल मापाडी या जागेसाठी ४जणांनी माघार घेतली आहे. दोन जण रिंगणात आहेत.
पाच मतदार संघात सरळ लढत
महीला राखीव, ओबीसी, आर्थिक दुर्बल, व्यापारी मतदार संघ व हमाल मापाडी या पाच मतदर संघात सरळ लढत होणार आहे. तीन पॅनल परस्परांविरुद्ध मैदानात उतरले असून अपक्ष उमेदवारांनी सर्वस्व पॅनल लावले आहे.